राजस्थान रॉयल्सची वाईट स्थिती, 19 व्या मोसमात सातव्यांदा पाहावा लागला असा दिवस

11 मे 2026

राजस्थानच्या गोलंदाजांनी ipl 2026 मधील 52 व्या सामन्यात गुजरात विरुद्ध सुमार बॉलिंग केली.  

राजस्थानने गुजरात विरुद्ध 229 धावा लुटवल्या. तर राजस्थानला फक्त 4 विकेट्सच घेता आल्या.

राजस्थानची आयपीएल 2026 स्पर्धेत 200 पेक्षा अधिक धावा लुटवण्याची ही सातवी वेळ ठरली.

राजस्थान यासह एका मोसमात संयुक्तरित्या सर्वाधिक 7 वेळा 200 पेक्षा अधिक धावा लुटवणारी पहिली टीम ठरली.

त्यामुळे आता राजस्थानने आगामी सामन्यात आणखी एकदा 200 पेक्षा धावा दिल्या की नको तो विक्रम त्यांच्या नावावर होईल. 

तसेच राजस्थान 2 हंगामात 7 वेळा 200 पेक्षा अधिक धावा देणारी एकमेव टीम आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळ 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे हे जाणून घेऊयात.