IPL 2026 : 19 वा मोसम आणि 10 कर्णधार, तुमच्या टीमचा कॅप्टन कोण?

11 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या निमित्ताने 10 संघांच्या कर्णधारांबाबत जाणून घेऊयात.

ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्संचं नेतृत्व करणार आहे. चेन्नईनेही 5 वेळा चॅम्पियन होण्याचा बहुमाम मिळवला आहे. 

ऑलराउंडर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. मुंबईने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 

अजिंक्य रहाणे याच्याकडे 19 व्या मोसमात केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.  केकेआरने 3 वेळा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलंय. 

रजत पाटीदार गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधारपदाची सूत्रं सांभाळणार आहे. रजतनेच त्याच्या कॅप्टन्सीत आरसीबीच्या पहिल्या ट्रॉफीची प्रतिक्षा संपवली.

ऑलराउंडर रियान पराग याची काही दिवसांपूर्वीच राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. 

अनुभवी आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची जबाबदारी पाहणार आहे.

विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन म्हणून 19 व्या मोसमात मैदानात उतरणार आहे.

प्रिन्स अर्थात शुबमन गिल हा पुन्हा एकदा गुजरात टायटन्सचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. 

अक्षर पटेल याच्याकडे दिल्ली कॅपिट्ल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.

तर श्रेयस अय्यर गतविजेत्या पंजाब किंग्स टीमचा कॅप्टन म्हणून खेळणार आहे.