IPL स्पर्धेत सर्वाधिक वेळा 250 धावा करणारे संघ, हैदराबादचा दबदबा

22 मे 2026

Created By:  संजय पाटील

हैदराबादने  22 मे रोजी आरसीबी विरुद्ध धावांचा डोंगर उभारला. हैदराबादच्या फंलदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांची धुलाई केली.

हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. SRH साठी इशानने 79, अभिषेकने 56 आणि क्लासेनने 51 धावा केल्या.

हैदराबादची यासह आयपीएल स्पर्धेत एका डावात 250 पेक्षा अधिक धावा करण्याची सहावी वेळ ठरली. तसेच हैदराबाद सर्वाधिक वेळा 250 धावा करणारी टीम ठरली.

आयपीएल स्पर्धेत हैदराबाद व्यतिरिक्त एकाही टीमला 3 पेक्षा अधिक वेळा 250 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. 

हैदराबादनंतर या यादीत आरसीबी आणि पंजाब किंग्सचा समावेश आहे. 

आरसीबी आणि पंजाब किंग्स दोन्ही संघांनी प्रत्येकी 3-3 वेळा 250 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

तसेच दिल्ली कॅपिट्ल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांनी प्रत्येकी  2-2 वेळा 250 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.