Ishan Kishan Srh Ipl
24 मार्च 2026
Created By: संजय पाटील
आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. पहिल्या फेरीत एकूण 20 सामने खेळवण्यात येणार आहेत.
या निमित्ताने आपण आयपीएलच्या 19 व्या मोसमातील ऑरेंज कॅपच्या 5 प्रबळ दावेदार फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
इशान किशन याने smat स्पर्धेत 517 धावा केल्या. तसेच इशानने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 317 धावा केल्या.
संजू सॅमसन ऑरेंज कॅपचा प्रबळ दावेदार आहे. संजूने टी20i वर्ल्ड कप स्पर्धेत बाद फेरीतील तिन्ही सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा केल्या.
विराट कोहली याने 18 व्या मोसमात 675 धावा केल्या. तसेच विराटने 8 वेगवेगळ्या हंगामात 500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
एडन मारक्रम याने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 286 धावा केल्या. तसेच एडनने 18 व्या हंगामात लखनौसाठी 445 धावा केल्या.
फिन एलन केकेआरसाठी खेळणार आहे. फिनने नुकत्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत 298 धावा केल्या. फिन ऑरेंज कॅपचा दावेदार आहे.