IPL 2026 : 19 व्या मोसमात सर्वात कमी कॅच सोडणारी टीम कोणती?

4 मे 2026

Created By:  संजय पाटील

ipl 2026 स्पर्धेत काही संघांनी सुमार फिल्डिंग केलीय. प्रत्येक सामन्यात कॅच सोडण्यात येत आहेत. मात्र एक टीम अशी आहे ज्यांनी 90 टक्के कॅचेस घेतल्या आहेत.

केकेआरने या मोसमात सर्वोत्तम फिल्डिंग केलीय. केकेआरची 19 व्या मोसमात कॅचेस घेण्याची टक्केवारी ही 88.6 इतकी आहे.

केकेआरने हैदराबाद विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने या सामन्यात 9 विकेट्स घेतल्या.

केकेआरनंतर दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहेत. राजस्थानची कॅच घेण्याची टक्केवारी ही 87.2 इतकी आहे.

आरसीबीनेही जबरदस्त कामगिरी केलीय. आरसीबीची कॅच घेण्याची टक्केवारी ही 85.7 इतकी आहे.

लखनौ सुपर जायंट्स कॅचेस घेणाऱ्या संघांच्या यादीत टॉप 5 मध्ये आहेत. लखनौची टक्केवारी ही 83.7 इतकी आहे.

गुजरात टायटन्स या यादीत पाचव्या स्थानी आहे. गुजरातची 19 व्या मोसमात कॅच घेण्याची टक्केवारी ही 80.5 इतकी आहे.