5 मे 2026
Created By: संजय पाटील
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाचा थरार सुरु आहे. एकूण 10 संघात प्लेऑफसाठी चुरस पाहायला मिळत आहे.
या 19 व्या मोसमात सर्वाधिक डॉट बॉल टाकण्याचा विक्रम हा गुजरातच्या मोहम्मद सिराज याच्या नावावर आहे.
मोहम्मद सिराज याने आतापर्यंत एकूण 109 डॉट बॉल टाकले आहेत.
मोहम्मद सिराज याने यासह इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मागे टाकलं आहे.
सिराजनंतर दुसऱ्या स्थानी जोफ्रा आर्चर विराजमान आहे. जोफ्राने आतापर्यंत 107 डॉट बॉल टाकले आहेत.
कगिसो रबाडा हा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रबाडाने आतापर्यंत 105 डॉट बॉल टाकले आहेत.
आयपीएल 2026 स्पर्धेत डॉट बॉलची वरील आकडेवारी ही 46 सामन्यांपर्यंतची आहे.