30 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
सनरायजर्स हैदराबादने खास कामगिरी केली आहे. हैदराबादने मुंबईला पराभूत करुन विजयी शतक पू्र्ण केलं आहे.
सनरायजर्स हैदराबादने यासह आयपीएलमध्ये 100 सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत प्रवेश केला आहे.
सनरायजर्स हैदराबाद 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने जिंकणारी आठवी टीम ठरली आहे.
तसेच मुंबई आयपीएल स्पर्धेत 150 पेक्षा अधिक सामने जिंकणारी पहिली टीम आहे. मुंबईने 153 सामने जिंकले आहेत.
चेन्नई सुपर किंग्स टीमने 145 सामने जिंकले आहेत. तसेच पंजाब किंग्सने 125 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
गतविजेत्या आरसीबीने 138 सामन्यांत मैदान मारलं आहे. तर केकेआरने 136 सामने जिंकले आहेत.
दिल्ली कॅपिट्ल्सने 121 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने 120 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.