21 एप्रिल 2026
Created By: संजय पाटील
केएल आयपीएल 2026 मध्ये 0 आणि 1 धावेवर आऊट झाला. मात्र त्यानंतर केएलला सूर गवसला
दिल्लीचा अनुभवी फलंदाज केएलने निराशाजनक सुरुवातीनंतर जोरदार कमबॅक केलं.
केएलने 4 पैकी 2 डावात अर्धशतक झळकावलं. केएलने हैदराबाद विरुद्ध 37 धावा केल्या.
त्यामुळे आता केएलकडे महेंद्रसिंह धोनी याला आयपीएल स्पर्धेत धावांबाबत मागे टाकण्यासाठी 13 धावांची गरज आहे.
महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहाव्या स्थानी आहे. धोनीने 5 हजार 439 धावा केल्यात.
तर केएल राहुल धावांबाबत सातव्या स्थानी आहे. केएलने 5 हजार 427 धावा केल्या आहेत.
तसेच आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंत 8 हजार 908 धावा केल्या आहेत.