17 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
भारताने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तानवर 61 धावांनी मात केली. इशान किशन भारताच्या विजयाचा हिरो ठरला.
इशानने 40 चेंडूत 77 धावा केल्या. इशानच्या खेळीच्या जोरावर भारताने 175 धावांपर्यंत मजल मारली.
इशानच्या अर्धशतकानंतर त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंदियाने इन्स्टा स्टोरी पोस्ट केली. आदितीने या स्टोरीत इशानच्या खेळीसाठी हार्ट इमोजीद्वारे आनंद व्यक्त केला.
आदिती मॉडेल आहे. आदितीने 2018 साली 'मिस सुपरनॅशनल इंडिया' खिताब पटकावला. तसेच तिने 2017 साली 'मिस इंडिया' स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक दिली होती.
आदिती इन्स्टाग्रामवर एक्टीव्ह असते. आदितीचे इस्टाग्रामवर 2 लाख 75 हजार फॉलोअर्स आहेत.
इशानचा लग्नाबाबतचा निर्णय कुटुंबाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया क्रिकेटरचे आजोबा अनुराग पांडे यांनी दिली.
इशानच्या आयुष्यात आदितीचं फार महत्त्व आहे. आदिती जयपूरची आहे, अशी माहिती अनुराग पांडे यांनी दिली.
दरम्यान आदिती आणि इशान हे पुन्हा एकदा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आले आहेत.