22 मार्च 2026
Created By: संजय पाटील
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी आयपीएलचा 19 वा हंगाम फार महत्त्वाचा आहे.
ऋषभ पंत 18 व्या मोसमात अपयशी ठरला होता. तसेच लखनौ टीमलाही काही खास करता आलं नाही.
त्यामुळे आता पंतसमोर 19 व्या मोसमात स्वत:ला कर्णधार आणि फलंदाज म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान आहे.
लखनौ सुपर जायंट्स टीमने 19 व्या मोसमाआधी प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतलं.
एलएसजीचे मालक संजीव गोयंका आणि संघातील खेळाडूंनी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचं दर्शन घेतलं.
लखनौ सुपर जायंट्स टीमकडून खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णी याचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
लखनौ 18 व्या मोसमातील आपला पहिला सामना हा 1 एप्रिलला खेळणार आहे. लखनौ या सामन्यात दिल्ली विरुद्ध भिडणार आहे.