राजस्थान रॉयल्सचा क्रिकेटर यशस्वी जैस्वाल याच्यासोबत असलेली फोटोतील ती व्हायरल तरुणी कोण?

27 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज यशस्वी जैस्वाल फटकेबाजीसाठी तयार झाला आहे.

यशस्वीकडून राजस्थान रॉयल्स  टीमला विस्फोटक सुरुवात करुन देण्यासह मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

या 19 व्या मोसमाची लगबग सुरु असताना यशस्वीचा एका तरुणीसोबतचा फोटो व्हायरल झाला आहे.

यशस्वी आणि तरुणीच्या व्हायरल फोटोची एकच चर्चा पाहायला मिळत आहे. मात्र ही तरुणी कोण आहे? 

यशस्वीसोबतच्या फोटोतील व्हायरल तरुणी ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. या तरुणीचं नाव कविता दास आहे.

कविता क्रिकेटपटूंपासून बॉलिवूड सेलिब्रिटीचं मेकअप करते. कविताचा यशस्वी व्यतिरिक्त राजस्थानचा कॅप्टन रियान पराग याच्यासोबतचा फोटोही व्हायरल झालाय.

कविता दास हीचा दीपक चाहर याच्यासोबतही फोटो आहे. त्यामुळे आता कविता एकच चर्चेत आली आहे.