IPL Most Ducks : सर्वाधिक वेळा झिरोवर आऊट झालेले फलंदाज,रोहित कितव्या स्थानी?

19 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल ipl स्पर्धेत सर्वाधिक 19 वेळा भोपळा न फोडता माघारी परतला आहे.

माजी फलंदाज दिनेश कार्तिक  दुसऱ्या स्थानी आहे. कार्तिक 18 वेळा भोपळा फोडण्यात अपयशी ठरला.

 रोहित शर्मा संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. हिटमॅन 18 वेळा झिरोवर आऊट झाला आहे.

ऑलराउंडर सुनील नारायण आयपीएल स्पर्धेत 17 वेळा आला तसाच माघारी परतला आहे.

राशिद खान याचाही या यादीत समावेश आहे. राशिद  16 वेळा झिरोवर आऊट झालाय.

माजी फिरकीपटू पीयूष चावला 16 सामन्यांमध्ये धावांचं खातं उघडण्यात अपयशी ठरला आहे. 

मंदीप सिंह हा 15 डावात खातं उघडण्यात अपयशी ठरला आहे.