टी 20i वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतक लगावणारे फलंदाज, टीम इंडियाचा एकमेव कोण?

19 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

ख्रिस गेल याने 2016 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध 47 बॉलमध्ये शतक केलं होतं. वर्ल्ड कपमध्ये वेगवान शतकाचा विक्रम गेलच्या नावावर आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानीही ख्रिस गेल विराजमान आहे. गेलने 2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 50 चेंडूत शतक झळकावलं होतं.

न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलम याने 2012 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत गेलपेक्षा 1 चेंडू जास्त खेळून 100 धावा केल्या होत्या. मॅक्यूलमने 51 बॉलमध्ये शतक केलं होतं.

श्रीलंकेच्या पाथुम निसांका याने 16 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयी धांवाचा पाठलाग करताना 52 चेंडूत शतक झळकावलं होतं.

पाकिस्तानच्या अहमद शहजाद याने 2014 साली  बांगलादेश विरुद्ध 58 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं.

दक्षिण आफ्रिकेच्या रायली रुसो याने बांगलादेश विरुद्ध 59 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं.

सुरेश रैना याने 2010 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. रैनाने शतकापर्यंत पोहचण्यासाठी 59 चेंडूंचा सामना केला होता.