टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक चौकार लगावणारे फंलदाज, रोहितचा कितवा नंबर?

31  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक चौकार लगावण्याचा विक्रम हा रोहितच्या नावावर आहे. रोहितने 47 सामन्यांमध्ये 115 चौकार लगावले आहेत.

श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने याने 31 सामन्यांमध्ये 111 चौकार लगावले आहेत.

विराट कोहली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 35 सामन्यांमध्ये 111 चौकार लगावले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर याने 41 टी 20i सामन्यांत 103 चौकार लगावले आहेत. 

तिलकरत्ने दिलशान याने 35 टी 20i सामन्यांमध्ये 101 चौकार लगावले आहेत.

इंग्लंडच्या जोस बटलर याने 35 सामन्यांमध्ये 91 चौकार लगावले आहेत.

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याने 33 टी 20i सामन्यांमध्ये 78 चौकार लगावण्याची कामगिरी केली आहे.

बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने  43 टी 20i सामन्यांमध्ये 74 चौकार लगावले आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या क्वींटन डी कॉक याने 27 सामन्यांमध्ये 72 चौकार लगावले आहेत.