17 मार्च 2026
Created By: संजय पाटील
आयपीएल 19 व्या मोसमाची सुरुवात 28 मार्चपासून होतेय. स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या 6 भारतीय फलंदाजांमध्ये जाणून घेऊया.
रोहित शर्मा भारतासाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज आहे. रोहितने 272 सामन्यांमध्ये 302 षटकार लगावले आहेत.
रोहितनंतर विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने 267 सामन्यांमध्ये 291 षटकार खेचले आहेत.
महेंद्रसिंह धोनी तिसऱ्या स्थानी आहे. धोनीने 278 सामन्यांत 264 षटकार ठोकले आहेत.
संजू सॅमसन याच्या नावावर 177 सामन्यांमध्ये 219 षटकारांची नोंद आहे.
केएल राहुल याने आयपीएलमधील 145 सामन्यांमध्ये 208 षटकार लगावले आहेत.
माजी फलंदाज सुरेश रैना या यादीत सर्वात शेवटी आहे. रैनाने 205 सामन्यांमध्ये 203 षटकार लगावले आहेत.