IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, मुंबई कितव्या स्थानी? 

14 मार्च  2026

मुंबई इंडियन्स आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकणारी टीम आहे. मुंबईने 277 पैकी 151 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

सीएसके अर्थात चेन्नई सुपर किंग्स या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. चेन्नईने 253 पैकी 142 सामने जिंकले आहेत.

केकेआरने या स्पर्धेच्या इतिहासात 265 सामने खेळले आहेत. केकेआरने त्यापैकी 135 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केलं आहे.

गतविजेचा आरसीबी अर्थात रॉयल चँलेंजर्स बंगळुरुने 132 सामने जिंकले आहेत. आरसीबी एकूण 18 हंगामात 271 सामने खेळली आहे.

पंजाब किंग्स टीमने आयपीएल स्पर्धेत 263 पैकी 119 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

दिल्ली कॅपिट्ल्सने एकूण 266 सामने खेळले आहेत. तर दिल्लीने पंजाबपेक्षा 1 सामना कमी जिंकला आहे. 

राजस्थान रॉयल्सने या स्पर्धेत एकूण 236 सामने खेळले आहेत. राजस्थानने त्यापैकी 114 सामने जिंकले आहेत.