20 मार्च 2026
Created By: संजय पाटील
आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा विक्रम जसप्रीत बुमराह याच्या नावावर आहे. बुमराहने 32 नो बॉल टाकले आहेत.
उमेश यादव या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. उमेश यादवने 24 नो बॉल टाकले आहेत.
अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा याचाही या यादीत समावेश आहे. इशांतने 23 वेळा बॉलिंग टाकताना रेषेबाहेर पाय टाकला आहे.
एस श्रीसंथ यानेही इशांत शर्मा याच्याप्रमाणे 23 बॉल टाकले आहेत.
अमित मिश्रा आयपीएलमध्ये सर्वाधिक नो बॉल टाकणारा फिरकीपटू आहे.
अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये 21 नो बॉल टाकले आहेत. मिश्रा सर्वाधिक नो बॉल टाकणाऱ्यांमध्ये पाचव्या स्थानी आहे.
यॉर्करचा बादशाह माजी गोलंदाज लसिथ मलिंगा याने 18 नो बॉल टाकले आहेत. मलिंगा सर्वाधिक नो बॉल टाकणारा पहिला विदेशी गोलंदाज आहे.