आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक POTM पुरस्कार जिंकणारे खेळाडू,सचिन कितव्या स्थानी?

14  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार-फलंदाज रिकी पाँटिंग याने 49 वेळा सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.

श्रीलंकेचा माजी विकेटकीपर फलंदाज कुमार संगकाराने potm पुरस्कार जिंकण्याबाबत अर्धशतक पूर्ण केलंय.

दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज ऑलराउंडर जॅक कॅलिस 57 वेळा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. 

श्रीलंकेचा माजी ऑलराउंडर सनथ जयसूर्या याने 58 वेळा सामनावीर होण्याचा बहुमान मिळवला होता.

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली  आतापर्यंत 71 वेळा मॅन ऑफ मॅच पुरस्कार विजेता ठरला आहे.

भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 

सचिनने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण आणि सर्वाधिक 76 वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याची कामगिरी केलीय.