भारत-न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये सर्वात जास्त धावा कुणाच्या नावावर?  रोहित-विराट कुठे?

11 जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

भारत-न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिनने 42 सामन्यांमध्ये 1750 धावा केल्या आहेत.

विराट कोहली याने न्यूझीलंड विरुद्ध 33 सामन्यांमध्ये 1 हजार 657 धावा केल्या आहेत.

रॉस टेलर याने टीम इंडिया विरुद्ध 35 सामन्यांमध्ये 1 हजार 385 धावा केल्या आहेत. 

केन विलियमसन याच्या नावावर 31 एकदिवसीय सामन्यांत 1 हजार 239 धावांची नोंद आहे.

न्यूझीलंडच्या नॅथन एस्टल याने भारत विरुद्ध 29 सामन्यांत 1 हजार 207 धावा केल्या आहेत. 

भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने 23 सामन्यांमध्ये 1 हजार 157 धावा केल्या आहेत.

भारताचे माजी फलंदाज मोहम्मद अझहरुद्दीन यांनी न्यूझीलंड विरुद्ध 40 सामन्यांमध्ये 1 हजार 118 धावा केल्या आहेत. 

न्यूझीलंडच्या माजी सलामीवीर स्टीफन फ्लेमिंग याने 40 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार 98 धावा केल्या आहेत.

दादा अर्थात सौरव गांगुली याने न्यूझीलंड विरूद्धच्या 32 सामन्यांमध्ये 1 हजार 79 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा याने भारत विरुद्ध न्यूझीलंड अर्थात न्यूझीलंड विरूद्धच्या 31 एकदिवसीय सामन्यांत 1 हजार 73 धावा केल्या आहेत.