12 मार्च 2026
Created By: संजय पाटील
सुरेश रैना टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक करणारा एकमेव फलंदाज आहे. रैनाने 2010 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावा केल्या होत्या.
संजू सॅमसन याने 2026 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद 97 धावा केल्या. संजू या स्पर्धेत मोठी खेळी करणारा दुसरा भारतीय ठरला.
रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने 2024 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध 92 धावा केल्या होत्या.
विराट कोहली याने 2016 साली वेस्ट इंडिज विरुद्ध नाबाद 89 धावांची खेळी केली होती.
सूर्यकुमार यादव याने 2026 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिकेविरुद्ध नाबाद 84 धावा केल्या होत्या.
विराटने 2016 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत नाबाद 82 धावांची खेळी केली होती.
विराटने 2022 साली पाकिस्तान विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत नाबाद 82 धावा केल्या होत्या.