30 मार्च 2026
Created By: संजय पाटील
आयपीएल स्पर्धेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक धावांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने केकेआर विरुद्ध 1161 धावा केल्या आहेत.
रनमशीन अर्थात विराट कोहली याने पंजाब किंग्स विरुद्ध 1 हजार 159 धावा केल्या आहेत.
विराट कोहली याने सीएसके विरुद्धही कमाल केलीय. विराटने सीएसके विरुद्ध 1 हजार 146 धावा केल्यात.
डेव्हिड वॉर्नर याने पंजाब किंग्स विरुद्ध 1 हजार 134 धावा केल्या आहेत.
विराट कोहली याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 1 हजार 130 धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 1 हजार 93 धावा केल्यात.
रोहित शर्मा याने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 1 हजार 57 धावा केल्या आहेत.