वनडेत चेसिंग करताना सर्वाधिक सिक्स कुणाच्या नावावर? रोहित पहिल्या स्थानी

12  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

रोहितने विजयी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 200 षटकार लगावलेत. रोहितने 159 सामन्यांमध्ये ही कामगिरी केलीय.

वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल या यादीत दुसऱ्या स्थानी आहे.  गेलने 153 सामन्यांमध्ये 177 षटकार लगावले आहेत.

शाहिद अफ्रिदी  तिसऱ्या स्थानी आहे. अफ्रिदीने 199 सामन्यांमध्ये 166 षटकार लगावलेत.

श्रीलंकेचा सनथ जयसूर्या या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. जयसूर्याने 214 सामन्यांमध्ये 109 षटकार लगावलेत.

न्यूझीलंडचा मार्टिन गपटील पाचव्या स्थानी विराजमान आहे. मार्टिनने 94 सामन्यांमध्ये 103 षटकार लगावले आहेत. 

दिग्गज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सहाव्या क्रमांकावर आहे. सचिनने 236 सामन्यांमध्ये 94 षटकार लगावले आहेत.

विराट कोहली याने 170 सामन्यांमध्ये 90 षटकार लगावलेत. विराट या यादीत सातव्या स्थानी आहे.

महेंद्रसिंह धोनी आठव्या क्रमांकावर आहे. धोनीने 189 सामन्यांमध्ये 88 षटकार खेचले आहेत.