भारतासाठी सर्वात जास्त टी 20i सामने खेळणारे खेळाडू, नंबर 1 कोण?

13  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक 159 टी 20i सामने खेळले आहेत. रोहित टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

विराटने भारताचं 125 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. विराटही टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झालाय.

ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने आतापर्यंत भारतासाठी 124 टी 20i सामने खेळले आहेत. 

कर्णधार सूर्यकुमार यादव याने आतापर्यंत टीम इंडियासाठी 99 टी 20i सामने खेळले आहेत.

माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने भारताचं 98 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार  टीम इंडियाकडून 87 टी 20i सामने खेळला आहे.

भारताचा ऑलराउंडर अक्षर पटेल याने 85 टी 20i सामने खेळले आहेत. 

यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने 83 टी 20i सामने खेळले आहेत. बुमराह भारताच्या यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे.