टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज, सूर्या या स्थानी

28  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. रोहितने 159 सामन्यांमध्ये 4 हजार 231 धावा केल्या आहेत.

विराट या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. विराटने 125 टी 20i सामन्यांमध्ये 4 हजार 188 धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादव या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. सूर्याने 103 सामन्यांमध्ये 2 हजार 967 धावा केल्या आहेत.

केएल राहुल याने 72 टी 20i सामन्यांमध्ये 2 हजार 265 धावा केल्या आहेत.

ऑलराउंडर हार्दिक पंड्या याने 128 टी 20i सामन्यांमध्ये 2 हजार 29 धावा केल्या आहेत.

शिखर धवन याने 68 टी 20i सामन्यांमध्ये 1 हजार 759 धावा केल्या आहेत.

महेंद्रसिंह धोनी याने 98 टी 20i सामन्यांमध्ये 1 हजार 617 धावा केल्या आहेत.

सुरेश रैना याने 78 टी 20i सामन्यांमध्ये 1 हजार 605 धावा केल्या आहेत.

अभिषेक शर्मा याने आतापर्यंत 37 टी 20i सामन्यांमध्ये 1 हजार 267 धावा केल्या आहेत.