T20I क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज, विराट कितव्या स्थानी?

9 जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा पाकिस्तानच्या बाबर आझम याच्या नावावर आहे.बाबरने 136 सामन्यांमध्ये 4 हजार 429 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा हा दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. भारताच्या माजी फलंदाजाने या फॉर्मेटमधील 159 सामन्यांत 4 हजार 231 रन्स केल्या आहेत. 

विराट कोहली याने 125 टी 20I सामन्यांमध्ये 4 हजार 188 धावा केल्या आहेत. विराट या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

इंग्लंडचा जोस बटलर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. बटलरने 144 सामन्यांमध्ये 3 हजार 869 धावा केल्यात.

आयर्लंड कर्णधार पॉल स्ट्रर्लिंग याने 156 टी 20I सामन्यांमध्ये 3 हजार 798 धावा केल्या आहेत. 

न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टील याने 122 सामन्यांमध्ये 3 हजार 531 रन्स केल्या आहेत.

पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान याने 106 सामन्यांमध्ये 3 हजार 414 धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज डेव्हीड वॉर्नर याने 110 सामन्यांमध्ये 3 हजार 277 धावा केल्या आहेत.