11 मार्च 2026
Created By: संजय पाटील
टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोहम्मद शमी याच्या नावावर आहे.
मोहम्मद शमी याने टीम इंडियासाठी आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत सर्वाधिक 22 विकेट्स मिळवल्या आहेत.
माजी वेगवान गोलंदाज झहीर खान या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. झहीरने बाद फेरीतील सामन्यांत 17 विकेट्स मिळवल्या आहेत.
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. बुमराहने आतापर्यंत भारतासाठी आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यांत एकूण 16 विकेट्स मिळवल्या आहेत.
माजी फिरकीपटू आर अश्विन याने आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीत 16 विकेट्स मिळवल्या आहेत.
माजी दिग्गज सचिन तेंडुलकर याने भारतासाठी आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत एकूण 15 विकेट्स मिळवल्या आहेत.
माजी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने भारतासाठी आयसीसी स्पर्धेच्या नॉक आऊट राऊंडमध्ये 15 विकेट्स मिळवल्या आहेत.