WTC 2025-2027 : स्पर्धेतील चौथ्या साखळीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज

9 जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

सायमन हार्मर याने चौथ्या साखळीत आतापर्यंत 30 विकेट्स मिळवल्या आहेत.

इंग्लंडच्या ब्रायडर्न कार्स याने या साखळीत आतापर्यंत झालेल्या सामन्यात 31 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने आयसीसी कसोटी स्पर्धेतील चौथ्या साखळीत 32 विकेट्स मिळवल्या आहेत.

जोश टंग याने 2025-2027 या साखळीत आतापर्यंत 37 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने 2025-2027 या साखळीत 39 विकेट्स मिळवल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा प्रमुख आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने या चौथ्या साखळीत सर्वाधिक विकेट्स मिळवल्या आहेत.

मिचेल स्टार्क याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत आतापर्यंत 46 विकेट्स घेतल्या आहेत.