IPL : आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे कर्णधार, हार्दिकचा कितवा नंबर?

13 मे 2026

Created By:  संजय पाटील

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप 5 कर्णधारांमध्ये 3 भारतीय आणि 2 विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

शेन वॉर्न याने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक 57 विकेट्स मिळवल्या आहेत.

शेन वॉर्न याच्यानंतर या यादीत दुसऱ्या स्थानी हार्दिक पंड्या विराजमान आहे. 

हार्दिक पंड्या याने कर्णधार म्हणून एकूण 68 सामन्यांत 40 विकेट्स मिळवल्या आहेत.

पॅट कमिन्स तिसऱ्या स्थानी आहे. पॅटने 34 सामन्यांत 38 विकेट्स मिळवल्या आहेत.

अनिल कुंबळे या यादीत चौथ्या स्थानी आहे. कुंबळेने 26 सामन्यांत 30 विकेट्स घेतल्या होत्या.

आर अश्विन पाचव्या स्थानी विराजमान आहे. अश्विनने 28 सामन्यांत नेतृत्व करताना 25 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.