नेपाळ क्रिकेट टीमची हवा, रोहितचा संघ याबाबतीत दुसऱ्या स्थानी

30  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत नेपाळ क्रिकेट टीमच्या सामन्यांच्या तिकीटांची जोरात मागणी आहे. नेपाळचे सर्व सामने हे वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहेत.

वानखेडे स्टेडियममध्ये टीम इंडियाच्या सामन्यांच्या  तिकीटांची सर्वाधिक विक्री झाली आहे. त्यानंतर या यादीत नेपाळचा दुसरा नंबर आहे.

नेपाळच्या सामन्यांच्या तिकीटांची मोठी मागणी असल्याचं मुंबई मिररने म्हटलं आहे. नेपाळच्या सामन्यासाठी चाहते वानखेडेत पोहचणार असल्याचं या वृत्तात म्हटलंय.

नेपाळ क्रिकेट टीम टी 20i वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 8 फेब्रुवारीला इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे.

नेपाळ त्यानंतर उर्वरित 3 सामने हे 12, 17 आणि 19 फेब्रुवारीला खेळणार आहे. 

नेपाळसमोर अनुक्रमे इटली, विंडीज आणि स्कॉटलँडचं आव्हान असणार आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित पौडेल नेपाळचं नेतृत्व करणार आहे.