12 मे 2026
कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक गोलंदाजांनी 100 विकेट्स घेतल्यात. मात्र सर्वात जास्त वयात ही कामगिरी कुणी केलीय?
पाकिस्तानच्या नोमान अली याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त वयात 100 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.
नोमान अली याने वयाच्या 39 वर्ष 213 व्या दिवशी 100 कसोटी विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
नोमानने यासह बॉबी पील यांचा विक्रम मोडीत काढला आहे. बॉबीने 1986 साली 39 वर्ष 180 व्या दिवशी विकेट्सचं शतक पूर्ण केलं होतं.
नोमानने अशाप्रकारे तब्बल 40 वर्षांनंतर कसोटीत सर्वात जास्त वयात 100 विकेट्स घेण्याचा विक्रम केला.
नोमानने बांगलादेश विरूद्धच्या ढाकात झालेल्या कसोटी सामन्यात विकेट्सचं शतक पूर्ण केलं.
दरम्यान बांगलादेशने पाकिस्तावर पहिल्या कसोटी सामन्यात 104 धावांनी विजय मिळवला.