टी 20I वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करणारे कर्णधार, धोनी कुठे?

17  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

धोनी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत  सर्वाधिक 33 टी 20i सामने खेळणारा कर्णधार आहे. धोनीने भारताला 20 सामन्यांमध्ये विजयी केलंय.

न्यूझीलंडच्या केन विलियमसन याने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 21 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. त्यापैकी 14 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा विजय झाला. 

डॅरेन सॅमी याने कॅप्टन म्हणून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील 18 पैकी 11 सामन्यांमध्ये विंडीजला विजय मिळवून दिला आहे.

बाबर आझम याने पाकिस्तानचं टी 20i वर्ल्ड कपमधील 17 सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. त्यापैकी 11 सामन्यांत पाकिस्तानचा विजय झालाय.

पॉल कॉलिंगवूड याने कॅप्टन म्हणून टी 20i वर्ल्ड कपमधील 17 पैकी 8 सामन्यांमध्ये इंग्लंडला विजयी केलंय. 

श्रीलंकेचा दासून शनाका टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत कर्णधार म्हणून 16 सामने खेळलाय. त्यापैकी 9 सामन्यांमध्ये श्रीलंकेचा विजय झालाय.

ग्रेम स्मिथ याने त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला टी 20i वर्ल्ड कपमधील 16 पैकी 11 सामने जिंकून दिले आहेत.