राशिद खानची ऐतिहासिक कामगिरी, टी 20 वर्ल्ड कपमध्ये काय केलं?

17 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

राशिद खान याने टी 20 क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. राशिद टी 20 क्रिकेटमध्ये 700 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला.

राशिद खान याने केलेल्या कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत यूएईवर विजय मिळवला.

राशिद खान याने यूएईच्या मोहम्मद अरफान याला आऊट केलं. राशिदने यासह टी 20 मध्ये 700 विकेट पूर्ण केल्या.

राशिदने यूएई विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 24 धावा देत 1 विकेट मिळवली. मात्र राशिदसाठी ही एकमेव विकेट ऐतिहासिक ठरली. 

राशिदने 518 व्या टी 20 सामन्यातील 513 व्या डावात 700 विकेट्स पूर्ण केल्या. राशिदने टी 20i क्रिकेटमध्ये 191 विकेट्स मिळवल्या आहेत.

टी 20 क्रिकेटमध्ये राशिद खाननंतर ड्वेन ब्राव्हो हा सर्वाधिक 631 विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

दरम्यान राशिद खान याच्याकडे अफगाणिस्तानाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तसेच राशिद बॉलिंगसह अप्रतिम बॅटिंगही करतो.