हार्दिकनंतर रवींद्र जडेजा ठरणार दुसराच ऑलराउंडर, फक्त 15 धावांची गरज

30 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

रवींद्र जडेजा याने सलग 8 मोसमात सीएसकेचं प्रतिनिधित्व केलं.  त्यानंतर जडेजा 30 मार्च रोजी 19 व्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून पहिला सामना खेळला. 

जडेजाला आयपीएल कारकीर्दीत हार्दिकप्रमाणे 4 हजार टी 20 धावा आणि 200 विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे.

रवींद्र जडेजा याने टी 20i क्रिकेटमध्ये 200 विकेट्स पूर्ण केल्या. मात्र त्याला 4 हजार धावांसाठी 15 रन्सची गरज आहे.

जडेजाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध बॅटिंगची संधी मिळाली नाही. त्यामुळे येत्या काही सामन्यात जडेजाचा 15 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे.

जडेजा 15 धावा करताच टी 20 क्रिकेटमध्ये 200 विकेट्स आणि 4 हजार धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरेल.

जडेजाने गेल्या 8 मोसमात  चेन्नई सुपर किंग्ससाठी बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान दिलं.

जडेजा आयपीएल स्पर्धेतील अनुभवी ऑलराउंडरपैकी 1 आहे. जडेजाने आतापर्यंत अनेकदा बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर संघाला विजयी केलंय.