Cricket : कोचनंतर आता कॅप्टनही झाला बापमाणूस, घरी छोट्या पाहुण्याचं आगमन

19 मार्च  2026

Created By:  संजय पाटील

आयपीएलच्या 19 व्या मोसमाचं काउंटडाऊन सुरु आहे. अशात गतविजेच्या आरसीबी टीमच्या कॅप्टनला गूड न्यूज मिळाली आहे.

आरसीबीला ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रजत पाटीदार बापमाणूस झाला आहे. रजत आणि ऐश्वर्या यांचा 2023 मध्ये विवाह झाला होता.

त्यानंतर ऐश्वर्याने मुलाला जन्म दिला आहे. ऐश्वर्या आणि रजत आई-बाबा झाले आहेत.

पहिलं अपत्य झाल्यामुळे रजतला आरसीबी टीमसोबत ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होता आलं नाही.

रजतआधी आरसीबीचा बॅटिंग कोच दिनेश कार्तिक आणि त्याची पत्नी यांना कन्यारत्न प्राप्त झालं.

योगायोग म्हणजे रजत पाटीदार आणि दिनेश कार्तिक या दोघांचा जन्मदिवसही सारखाच आहे. दोघांची 1 जून ही जन्मतारीख आहे.

आरसीबी गतविजेता आहे. त्यामुळे कॅप्टन या नात्याने रजतसमोर ही ट्रॉफी आपल्याकडे कायम राखण्याचं आव्हान असणार आहे.