11 मे 2026
आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम सुरु आहे. या निमित्ताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा कर्णधार कोण होता? हे जाणून घेऊयात.
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा कर्णधार होण्याचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे.
विराट कोहली याने वयाच्या 22 वर्ष 187 व्या दिवशी कर्णधार म्हणून पदार्पण केलं होतं.
तसेच स्टीव्हन स्मिथ आयपीएल स्पर्धेत नेतृत्व करणारा सर्वात युवा विदेशी खेळाडू आहे. स्टीव्हनने 22 वर्ष 344 व्या दिवशी नेतृत्वाची धुरा सांभाळली होती.
सुरेश रैना हा चेन्नईचा सर्वात युवा कर्णधार राहिला आहे. रैनाने वयाच्या 23 वर्ष 112 व्या दिवशी पहिल्यांदा नेतृत्व केलं होतं.
रियान पराग याने 23 वर्ष 133 व्या दिवशी राजस्थानचं नेतृत्व केलं होतं. रियान राजस्थानचा सर्वात युवा कर्णधार ठरला होता.
श्रेयस अय्यर याला वयाच्या 23 वर्ष 142 व्या दिवशी नेतृत्वाची जबाबदारी मिळाली होती. तर पंतने 23 वर्ष 188 व्या दिवशी कर्णधारपद स्वीकारलं होतं.