आरसीबीसाठी प्लेऑफमध्ये कोणता खेळाडू ठरणार गेमचेंजर? जाणून घ्या

25 मे 2026

Created By:  संजय पाटील

आरसीबी आयपीएल 2026 स्पर्धेत क्वालिफायर 1 मॅचमध्ये गुजरात विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांना सामना जिंकून फायनलमध्ये पोहचण्याची समसमान संधी आहे. 

आरसीबीसाठी संपूर्ण प्लेऑफ स्पर्धेत वेंकटेश अय्यर गेमचेंजर खेळाडू ठरु शकतो. त्याच्या कामगिरीबाबत जाणून घेऊयात.

वेंकटेश अय्यरने प्लेऑफ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय.वेंकटेशने 78च्या सरासरीने 234 धावा केल्या आहेत.

वेंकटेशने प्लेऑफच्या सामन्यात 149.04 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. वेंकटेशमध्ये सामना फिरवण्याची क्षमता आहे.

वेंकटेशने प्लेऑफच्या इतिहासात खेळलेल्या 5 सामन्यांत 4 अर्धशतकं लगावली आहेत. 

वेंकटेश अय्यर प्लेऑफमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहे.

वेंकटेशने 19 व्या मोसमातील साखळी फेरीत 5  सामन्यांत 79 च्या सरासरीने 158 रन्स केल्या आहेत. वेंकटेशने या दरम्यान 1 अर्धशतक ठोकलं आहे.