रिंकू सिंहची कडक कामगिरी, ठरला दुसराच भारतीय खेळाडू

30  जानेवारी  2026

Created By:  संजय पाटील

रिंकू सिंह याने न्यूझीलंड विरूद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात खास कामगिरी केली. रिंकू यासह अशी कामगिरी करणारा दुसराच भारतीय खेळाडू ठरला.  

रिंकूने न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात एकूण 4 कॅच घेतल्या. रिंकू अशी कामगिरी करणारा चौथा खेळाडू ठरला.

अजिंक्य रहाणे याने 12 वर्षांआधीच अशीच कामगिरी केली होती. अजिंक्य भारतासाठी असा कारनामा करणारा पहिलाच खेळाडू ठरला होता.

रहाणेने 2014 साली इंग्लंड विरुद्ध बर्मिंगघममध्ये टी 20i सामन्यात 4 कॅच घेतल्या होत्या.

रिंकूने या न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यात कॅच घेण्याव्यतिरिक्त बॅटिंगनेही योगदान दिलं. 

रिंकूने न्यूझीलंड विरूद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात 39 धावा केल्या.

दरम्यान न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात विजय मिळवला. मात्र टीम इंडियाने ही मालिका आपल्या नावावर केली आहे.