IPL : आयपीएल स्पर्धेत ओपनिंग-तिसऱ्या स्थानी शतक करणारे फलंदाज, कुणाचा समावेश?

13 एप्रिल 2026

Created By:  संजय पाटील

आयपीएल तसेच टी 20 क्रिकेटमध्ये शतक करणं आव्हानात्मक असतं. प्रत्येक फलंदाजाचं टी 20 क्रिकेटमध्ये शतक करण्याचं स्वप्न असतं.

आयपीएल स्पर्धेत ओपनिंग आणि तिसऱ्या स्थानी शतक करणाऱ्या फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 2 फलंदाजच ओपनिंग आणि तिसऱ्या स्थानी शतक झळकावण्यात यशस्वी ठरले आहेत.

या 2 फलंदाजांमध्ये रोहित शर्मा आणि संजू सॅमसन यांचा समावेश आहे.

रोहितने आयपीएल कारकीर्दीत 2 शतकं झळकावली आहेत. रोहितने ओपनिंग आणि एकदा तिसऱ्या स्थानी खेळताना शतक केलं आहे.

तसेच संजू सॅमसन याने आयपीएलमध्ये 4 वेळा शतक लगावलं आहे. 

संजू सॅमसन याने आयपीएल स्पर्धेत ओपनिंग आणि तिसऱ्या स्थानी बॅटिंग करताना शतक लगावलं आहे.