28 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
भारताचा ऑलराउंडर शिवम दुबेने न्यूझीलंड विरुद्ध 65 धावांची खेळी केली. शिवमने या दरम्यान हार्दिक पंड्या याला मागे टाकलं.
शिवमने या खेळीत अवघ्या 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. यासह शिवमने हार्दिकला पछाडलं.
शिवम दुबे हार्दिकला मागे टाकत भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला.
हार्दिक पंड्या याने 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. हार्दिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2025 मध्ये ही कामगिरी केली होती.
अभिषेक शर्मा भारतासाठी वेगवान अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
अभिषेक शर्मा याने न्यूझीलंड विरूद्धच्या याच मालिकेत 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम हा युवराज सिंह याच्या नावावर आहे. युवीने 12 चेंडूत ही कामगिरी केली होती.