2 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्स याने 2022 साली शतक झळकावलं होतं.
दक्षिण आफ्रिकेच्या रायली रॉसो याने 2022 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक ठोकलं होतं.
इंग्लंडच्या जॉस बटलर याने 2021 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकावण्याची कामगिरी केली होती.
बांगलादेशच्या तमीम इक्बाल याने 2016 साली टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक ठोकलं होतं.
पाकिस्तानसाठी अहमद शहजाद याने 2014 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक ठोकलं होतं.
एलेक्स हेल्स याने 2014 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडसाठी शतक केलं होतं.
न्यूझीलंडच्या ब्रँडन मॅक्युलम याने 2012 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक केलं होतं.
श्रीलंकेच्या महिला जयवर्धने याने 2010 साली झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक केलं होतं.
सुरेश रैना टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कप शतक करणारा एकमेव फलंदाज आहे. रैनाने 2010 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ही कामगिरी केली होती.
ख्रिस गेल याच्या नावे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे.
ख्रिस गेल हाच टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात शतक झळकावणारा पहिला फलंदाज आहे.
क्रिस गेल याने 2007 आणि 2016 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत शतक केलं होतं.