सूर्याच्या निशाण्यावर विराट विक्रम, एका मोठ्या खेळीची गरज, रेकॉर्ड काय?

11 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

टीम इंडिया टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला दुसरा सामना हा नामिबिया विरुद्ध खेळणार आहे.

भारत विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना हा नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे.

कर्णधार सूर्यकुमार यादव याला या सामन्यात विराट कोहलीचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. 

सूर्याकडे टी 20i क्रिकेटमध्ये विराटचा भारतासाठी मायदेशात सर्वाधिक 14 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे.

सध्या हा विक्रम संयुक्तरित्या विराट आणि सूर्यकुमार यादव या दोघांच्या नावावर आहे.दोघांनीही भारतात 14 डावांत 50 पेक्षा धावा केल्या आहेत. 

सूर्याने यूएसए विरूद्धच्या सामन्यात नाबाद 84 धावांची खेळी केली होती.

त्यामुळे आता सूर्या नामिबिया विरूद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावून विराटचा विक्रम मोडीत काढतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.