कॅप्टन सूर्याची जबरदस्त ओपनिंग, यूएसए विरुद्ध इतके विक्रम

7 फेब्रुवारी  2026

Created By:  संजय पाटील

भारताने यूएसएवर 29 धावांनी मात केली. कर्णधार सूर्यकुमार यादव भारताच्या विजयाचा हिरो ठरला. 

सूर्याने या सामन्यात नाबाद 84 धावा केल्या. सूर्याने या खेळीत 4 षटकार आणि 10 चौकार लगावले. 

सूर्याचं हे यूएसए विरुद्ध सलग दुसरं अर्धशतक ठरलं. तसेच सूर्याची ही 2026 मधील 6 डावांतील अर्धशतक करण्याची चौथी वेळ ठरली. 

सूर्याने या खेळीसह टी 20I मध्ये कर्णधार म्हणून 1 हजार धावा पूर्ण केल्या. सूर्याने केलेल्या  84 धावांच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

सूर्याची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सामनावीर पुरस्कार जिंकण्याची चौथी वेळ ठरली. 

सूर्या यासह भारतासाठी टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक 17 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकणारा फलंदाज ठरला. 

सूर्यकुमार यादव याने याबाबतीत विराट कोहली याला (16 POTM) मागे टाकलं.