19 जानेवारी 2026
Created By: संजय पाटील
दिग्गज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय कारकीर्दीत भारतात एकूण 164 सामने खेळले आहेत.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने मायदेशात आतापर्यंत 130 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने भारताचं भारतात 127 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.
मोहम्म्द अझहरुद्दीन भारतात 113 एकदिवसीय सामने खेळला आहे. अझहरुद्दीन भारताचं नेतृत्वही केलंय.
सिक्सर किंग युवराज सिंह टीम इंडियासाठी भारतात 108 एकदिवसीय सामने खेळला आहे.
हिटमॅन रोहित शर्मासाठी न्यूझीलंड विरूद्धचा तिसरा सामना खास ठरला. रोहितचा हा भारतातील 100 वा एकदिवसीय सामना ठरला.
दिग्गज राहुल द्रविड याने भारताचं मायदेशात 97 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.