15 मे 2026
Created By: संजय पाटील
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं लगावणाऱ्या संघाच्या यादीत आयपीएल स्पर्धेतील आरसीबी टीमचा समावेश झाला आहे.
टी 20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतकांचा विक्रम हा टीम इंडियाच्या नावावर आहे.
टीम इंडियाने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 25 शतकं लगावली आहेत.
टीम इंडियानंतर या यादीत आरसीबी दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने एकूण 20 शतकं लगावली आहेत.
भारत आणि आरसीबी या दोनच संघांनी टी 20 क्रिकेटच्या इतिहासात 20 आणि त्यापेक्षा अधिक शतकं लगावली आहेत.
टीम इंडिया, आरसीबीनंतर या यादीत तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स विराजमान आहे.
राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 19 शतकं लगावली आहेत.