26 मार्च 2026
Created By: संजय पाटील
आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर आहे. विराटने 63 अर्धशतकं झळकावली आहेत.
विराटनंतर या यादीत डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या स्थानी आहे. वॉर्नरच्या नावावर 62 अर्धशतकांची नोंद आहे.
गब्बर अर्थात शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने आयपीएलमध्ये 51 अर्धशतकं झळकावली आहेत.
रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रोहितने आयपीएलमध्ये 47 अर्धशतकं झळकावली आहेत.
केएल राहुल याच्या नावावर आयपीएलमध्ये 40 अर्धशतकांची नोंद आहे.
मिस्टर 360 अर्थात एबी डीव्हीयर्स याने आयपीएल कारकीर्दीत 40 अर्धशतकं लगावली आहेत.
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा माजी फलंदाज सुरेश रैना याने 39 अर्धशतकं लगावली आहेत.