13 मे 2026
Created By: संजय पाटील
विराटने बुधवारी 13 मे रोजी केकेआर विरुद्ध शतक ठोकलं. विराटने या खेळी दरम्यान मोठा विक्रम आपल्या नावावर केला.
विराटने केकेआर विरुद्ध रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये अर्धशतक झळकावलं.
विराटने 32 चेंडूत 50 धावा केल्या. विराटचं आयपीएल कारकीर्दीतील केकेआर विरुद्धचं नववं अर्धशतक ठरलं.
विराट कोहली यासह केकेआर विरुद्ध सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला.
विराटने यासह रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि सुरेश रैना या तिघांना मागे टाकलं.
रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर आणि सुरेश रैना या तिघांनी केकेआर विरुद्ध प्रत्येकी 8-8 अर्धशतकं लगावलेत.
तसेच विराटने या खेळीदरम्यान 19 व्या मोसमात 400 धावांचा टप्पा पार केला. विराटची एका मोसमात 400 पेक्षा अधिक धावा करण्याची 12 वी वेळ ठरली.