17 मार्च 2026
Created By: संजय पाटील
आयपीएलच्या 19 व्या हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होतेय. या निमित्ताने 18 व्या हंगामापर्यंत किती फलंदाजांनी शतक केलंय हे जाणून घेऊयात.
आयपीएल स्पर्धेत 2008 पासून ते 2025 पर्यंत एकूण 58 फलंदाजांनी शतक झळकावलं आहे.
विराट कोहली याच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 शतकं झळकावण्याचा विक्रम आहे.
विराटनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी जोस बटलर विराजमान आहे. बटलरने 7 शतकं झळकावली आहेत.
ख्रिस गेल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने 6 शतकं ठोकली आहेत.
केएल राहुल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. केएलने आयपीएलमध्ये 5 शतकं झळकावली आहेत.
शुबमन गिल आयपीएलमधील शतकांबाबत पाचव्या स्थानी आहे. गिलने 4 शतकं लगावली आहेत.