8 फेब्रुवारी 2026
Created By: संजय पाटील
श्रीलंकेने वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली. श्रीलंकेने आयर्लंडवर मात केली.
श्रीलंकेने आयर्लंडवर 20 धावांनी मात करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
श्रीलंकेचा ऑलराउंडर वानिंदु हसरंगा याने आयर्लंड विरूद्धच्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या.
वानिंदु हसरंगा याने यासह एका झटक्यात 3 गोलंदाजांना मागे टाकलं. वानिंदुने लसिथ मलिंगा, राशिद खान आणि शाहिद आफ्रिदी या तिघांना मागे टाकलं.
वानिंदु यासह टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. वानिंदुच्या नावावर आता 20 सामन्यात 40 विकेट्सची नोंद आहे.
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हा शाकिब अल हसन याच्या नावावर आहे.
बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 43 सामन्यांमध्ये 50 विकेट्स घेतल्या आहेत.