19 मे 2026
Created By: संजय पाटील
आयपीएल 2026 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत आतापर्यंत कोणत्या संघाने सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये धडक दिलीय?
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे.
चेन्नई सुपर किंग्स टीमने आतापर्यंत एकूण 12 वेळा प्लेऑफचं तिकीट मिळवलं आहे.
चेन्नईनंतर मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी आहे. मुंबई 11 वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे.
आरसीबीने यंदा प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. आरसीबीने यासह प्लेऑफमध्ये पोहचण्याबाबत मुंबईची बरोबरी साधली आहे.
सनरायझर्स हैदराबादनेही यंदा प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. हैदराबादची प्लेऑफमध्ये पोहचण्याची यंदाची आठवी वेळ आहे.
कोलकाता नाईट रायडर्स टीम एकूण 8 वेळा प्लेऑफमध्ये पोहचली आहे.