IPL : स्पर्धेत सर्वाधिक वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारे संघ

7 मे 2026

Created By:  संजय पाटील

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळ 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे हे जाणून घेऊयात.

मुंबई इंडियन्सने सर्वाधिक वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याबाबत राजस्थान रॉयल्सला मागे टाकलं आहे.

मुंबईने लखनौ विरुद्ध 229 धावा चेज केल्या. मुंबईची 200 पेक्षा अधिक धावा चेज करण्याची सातवी वेळ ठरली. मुंबईने अशाप्रकारे राजस्थानला मागे टाकलं.

आयपीएलमध्ये सर्वाधिक 11 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम पंजाबच्या नावावर आहे.

गुजरात टायटन्सने सर्वात कमी 2 वेळा 200 पेक्षा अधिक धावा चेज केल्या आहेत.

सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सप्रमाणे आयपीएल स्पर्धेत 6 वेळा 200 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग केला आहे.  

तसेच लखनौ, कोलकाता आणि चेन्नईने प्रत्येकी 3 तर दिल्लीने 4 वेळा  200 पेक्षा अधिक धावा चेज केल्या आहेत.